Canada Hindu Priest Suspended : कथित चिथावणीखोर विधाने केल्याने ब्रॅम्प्टन (कॅनडा) येथील हिंदु सभा मंदिराच्या पुजार्याची हकालपट्टी
ब्रॅम्पटन (कॅनडा) – येथील हिंदु सभा मंदिरात खलिस्तानींनी हिंदु भाविकांना मारहाण केल्याची घटना ३ नोव्हेंबर या दिवशी घडली होती. या घटनेच्या वेळी कथित चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप करत मंदिरातील पुजार्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. या पुजार्यांचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला होता. यात त्यांनी आक्रमणाच्या विरोधात संघटित होऊन लढणे आवश्यक असल्याचे म्हटले होते.
ब्रॅम्प्टन शहराचे महापौर पॅट्रिक ब्राऊन यांनी हिंसाचाराचा निषेध केला होता, तसेच त्यांनी म्हटले की, कोणत्याही धर्मगुरूंनी हिंसक विधान किंवा समुदायामध्ये हिंसा आणि द्वेष वाढेल, असे विधान करू नये. या ठिकाणी बहुसंख्य शीख आणि हिंदु सामंजस्याने रहातात. ते कुठल्याही प्रकारचा हिंसाचार सहन करत नाहीत.
महापौर ब्राऊन यांच्या या विधानानंतर हिंदु सभा मंदिराचे अध्यक्ष मधुसूदन लामा यांनी पुजार्याला काढून टाकले. यासंदर्भात मंदिराकडून एक निवेदनही प्रसिद्ध करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या रक्षणार्थ विधाने केलील, म्हणजे ती चिथावणीखोर विधाने असतात, हा आजार कॅनडातील लोकांनाही होणे हिंदूंसाठीच दुर्दैवी ! |