इस्लामचा प्रचार करणाऱ्यांना या देशांमध्ये दिली जाते फाशीची शिक्षा !
नवी देहली – जगभरात अनेक धर्म आहेत, जर आपण भारताविषयी बोललो, तर हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे जिथे हिंदु, मुसलमान, शीख आणि ख्रिस्ती यांसारख्या इतर अनेक धर्मांचे लोकही एकत्र रहातात. जगात ५७ इस्लामी देश असले, तरी असे काही देश आहेत जिथे मुसलमानांना प्रवेश मिळत नाही. या देशांना ‘मशिदीमुक्त देश’ म्हटले जाते आणि इस्लाम धर्माच्या अनुयायांनाही या देशांमध्ये प्रवेश मिळत नाही.
जगात असे ५ देश आहेत, जिथे मुसलमानांना रहाण्यास मनाई आहे. या देशांमध्ये मुसलमानांची लोकसंख्या शून्य आहे. काही देशांमध्ये इस्लामचा प्रचार केल्यास मृत्यूदंडही होऊ शकतो.
१. व्हॅटिकन सिटी
या ५ देशांच्या सूचीत पहिले नाव व्हॅटिकन सिटीचे आहे. हा जगातील एकमेव देश आहे जिथे एकही मुसलमान रहात नाही. इटलीची राजधानी रोमजवळ स्थापन झालेल्या व्हॅटिकन सिटीमध्ये फक्त ख्रिस्ती धर्माचे अनुयायीच राहू शकतात. जगातील या सर्वांत लहान देशात मुसलमानांच्या येण्यावर पूर्णपणे बंदी आहे. ज्याप्रमाणे मक्का शहरात मुसलमानेतरांना प्रवेश करण्यास मनाई आहे, त्याचप्रमाणे मुसलमानांना व्हॅटिकनमध्ये प्रवेश करण्यास मनाई आहे. हे पूर्णपणे धार्मिक स्थळ आहे.
२. टोकेलाऊ (न्यूझीलंडच्या जवळचा देश)
टोकेलाऊ या सूचीत दुसर्या क्रमांकावर आहे, जे एक लहान बेट आहे आणि जगातील सर्वांत लहान आर्थिक देशांपैकी एक आहे. येथील एकूण लोकसंख्या १५०० च्या आसपास आहे आणि येथे कोणतीही मशीद किंवा मदरसा नाही. येथे मुसलमानांची लोकसंख्या अगदीच नगण्य आहे. येथे मुसलमानांच्या वस्तीला पूर्णपणे बंदी आहे. या छोट्या बेटावर इस्लामचा प्रचार करणार्यासाठी कठोर शिक्षेचे प्रावधान (तरतूद) आहे, जी काही वेळा मृत्यूदंडापर्यंतही वाढू शकते.
३. उत्तर कोरिया
उत्तर कोरियाविषयी सांगायचे झाले, तर येथे इस्लामसह इतर सर्व धर्मांचे पालन करण्यास सक्त मनाई आहे. येथे मंदिरे, मशिदी आणि चर्च बांधणे, हा कायदेशीर गुन्हा मानला जातो. येथे मुसलमानांची संख्या एकेकाळी ३ सहस्रांपर्यंत होती; परंतु आता ती शून्याच्या जवळपास आली आहे. जे मुसलमान इथे होते, ते एक तर देश सोडून गेले किंवा मारले गेले. उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन नास्तिकतेवर विश्वास ठेवतो आणि इस्लामचा प्रचार केल्यास मृत्यूदंडही होऊ शकतो.
४. स्लोव्हाकिया
स्लोव्हाकिया हा जगातील एकमेव देश आहे, जिथे आजपर्यंत एकही मशीद बांधलेली नाही. इथे मुसलमान ना मशिदी बांधू शकतात, ना मदरसे चालवू शकतात. स्लोव्हाकिया एकेकाळी ऑट्टोमन साम्राज्याचा भाग होता जिथे मुसलमानांनी ३०० वर्षे राज्य केले; परंतु आज येथे मुसलमान लोकसंख्या नगण्य आहे. येथील पहिले रुग्णालयही इस्लामी शासकांनी बांधले होते आणि आज मुसलमानांवर अनेक बंधने आहेत.
५. सॉलोमन बेटे
या सूचीत सॉलोमन बेटांचे नावही समाविष्ट आहे. येथील एकूण लोकसंख्या ७ लाख आहे; परंतु मुसलमानांची संख्या ७० पेक्षा अल्प आहे. वर्ष १९९५ मध्ये तबलिगी जमातने काही लोकांचे इस्लाममध्ये धर्मांतर केले होते; परंतु आता या देशात इस्लामचा खुलेआम प्रचार करण्यावर पूर्ण बंदी आहे. येथे एकच छोटी मशीद असून ती हटवण्यासाठी अनेकदा आंदोलने होत आहेत.