ईदची कुर्बानी आणि दिवाळीचा दीपोत्सव !

ईदची कुर्बानी आणि दिवाळीचा दीपोत्सव (प्रतीकात्मक चित्र)

नवी मुंबई येथील काही ठिकाणी मुसलमानबहुल भागात दिवाळीत दिवे लावण्यास मनाई करण्यात आली. काही ठिकाणी फटाके फोडणार्‍या लहान मुलांना मारहाणही करण्यात आली. यावर काही जणांनी अकलेचे तारे तोडले, ‘जशी सार्वजनिक सोसायटीत ईदची कुर्बानी चालत नाही, तसे दिवाळीचे कंदील, दिव्यांची आरासही न चालल्यास काय अडचण आहे ?’

मुळात ईदची कुर्बानी आणि दिवाळीचा कंदील यांची बरोबरी तरी होऊ शकेल का ? वैचारिक सुंता झालेल्यांना अंधःकार आवडतो. त्यामुळे दिवाळीचा आकाशकंदील पाहून ते नक्कीच विरोध करणार; पण आज आकाशकंदिलाला विरोध उद्या संक्रांत, दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यांनाही याच न्यायाने विरोध झाल्यास हिंदु समाज याकडे कसे पहाणार आहे ? कि मतांचे लांगूलचालन करणार्‍या सर्वपक्षीय शासनकर्ते आणि ‘सेक्युलर’ (निधर्मी) शिक्षणपद्धतीतून बाहेर पडलेले प्रशासकीय अधिकारी यांच्यावर अवलंबून रहाणार आहे ?, हे आतापासून ठरवायला हवे.

– श्री. प्रशांत हेमंत जुवेकर, जळगाव