पुणे महापालिककडे मिळकत करापोटी १७ कोटी रुपये जमा !
राजकीय नेत्यांनी थकित मिळकत कर भरला
पुणे – विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या आणि उमेदवारी निश्चित असलेल्या इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज सादर करतांना महापालिकेच्या कोणताही कराची थकबाकी नसल्याचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एन्. ओ. सी.) सादर करावे लागते. त्यामुळे महापालिकेकडे अनेक राजकीय नेत्यांनी थकबाकी असलेला मिळकत कर भरला आहे. मिळकत करापोटी १७ कोटी रुपये जमा झाले आहेत. याच मिळकत कर वसुलीसाठी महापालिकेच्या कर्मचार्यांना त्रास सहन करावा लागतो. आता मात्र अनेक वर्षे थकबाकी न भरणार्या राजकारण्यांनी स्वत:हून महापालिकेमध्ये कर भरणा केला आहे. (असे शासनकर्ते जनतेसमोर काय आदर्श ठेवणार ? – संपादक)
मिळकत कर भरणा करण्यासाठी महापालिकेने नोटिसा काढल्या होत्या. त्याविषयी महापालिकेतील अधिकार्यांना धमकावल्याचे प्रकार काही महिन्यांपूर्वी घडले होते. राज्यातील काही मोठ्या नेत्यांची थकबाकी १ ते २ कोटी रुपये, तर काहींची ४ ते ५ कोटी रुपयांची होती. (मिळकत कर थकवणार्या आणि वसुलीसाठी राजकीय दबाव आणणार्या राजकीय नेत्यांवर फौजदारी गुन्हे नोंद करायला हवेत, असे कुणाला वाटल्यास नवल ते काय ? – संपादक)
संपादकीय भूमिकाकेवळ निवडणुकीपुरता करभरणा करणारे आणि वर्षानुवर्षे करचुकवेगिरी करणारे स्वार्थी मनोवृत्तीचे राजकीय नेते काय कामाचे ? |