पुणे येथील कु. सान्वी जरीपटके (वय १३ वर्षे) हिला रामनाथी आश्रमात आलेल्या अनुभूती

पुणे येथील कु. सान्वी जरीपटके वर्ष २०२४ च्या उन्हाळ्याच्या सुटीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधना शिकण्यासाठी आली होती. आश्रमातील वास्तव्याच्या कालावधीत तिला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

कु. सान्वी जरीपटके

१. ‘मी आश्रमाच्या स्वागतकक्षातील श्रीकृष्णाच्या सात्त्विक चित्राकडे बघत होते. तेव्हा मला ‘श्रीकृष्ण श्वास घेत आहे’, असे वाटले.

२. मी पू. भार्गवराम प्रभु (सनातनचे पहिले बालसंत, वय ७ वर्षे) यांना पहिल्यांदा पाहिले. तेव्हा मला वाटले, ‘साक्षात् प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आले आहेत.’

३. रात्री मी झोपायला गेल्यावर मला झोप लागली नाही. तेव्हा मी श्रीकृष्णाला प्रार्थना केली. काही वेळाने मला ‘माझ्या बाजूला कुणीतरी आले आहे’, असे वाटले. नंतर माझ्या मनात विचार आला, ‘माझ्यासमवेत श्रीकृष्ण आहे.’

४. मी धान्य विभागामध्ये सेवा करण्यासाठी गेले होते. तेव्हा मी देवाला प्रार्थना केली, ‘तू माझ्यासमवेत धान्य निवडायला ये’, त्यामुळे माझी धान्य निवडण्याची सेवा लवकर झाली’, अशी मला अनुभूती आली.’

– कु. सान्वी जरीपटके (वय १३ वर्षे), पुणे (१४.५.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक