अभिनेते शाहरूख खान याला धमकी !
मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते शाहरूख खान याला धमकी मिळाली आहे. ‘५० लाख रुपये न दिल्यास ठार करीन’, असे धमकी देणार्याने सांगितले. यानंतर त्याच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आहेत. पोलिसांनी धमकी देणार्याला त्याचे नाव विचारले असता त्याने ‘हिंदुस्थानी’ असे सांगितले. अधिक शोध घेतला असता तो छत्तीसगडमधील रायपूर येथील फैजान खान असल्याचे समजले. फैजानच्या शोधासाठी पोलीस रायपूर येथे गेले असता फैजानने त्याचा भ्रमणभाष ५ दिवसांपूर्वीच चोरी झाल्याचे सांगितले. त्याने चोरीची तक्रारही प्रविष्ट केली आहे. त्यामुळे भ्रमणभाषची चोरी करून कुणी धमकी दिली, याचा शोध चालू आहे.