सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना प्रतिमहिना ३ सहस्र ५०० रुपये देणार !
वंचित बहुजन आघाडीचे आश्वासन
मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकच पक्ष ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या अंतर्गत ठराविक रक्कम देण्याची घोषणा करत आहेत. याआधी महाविकास आघाडीसह महायुतीनेही रकमेची घोषणा केली होती. आता प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी या पक्षाने सत्तेत आल्यास महिलांना प्रतिमहिना ३ सहस्र ५०० रुपये देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
महायुती शासनाने २ सहस्र १०० रुपये, तर महाविकास आघाडीने ३ सहस्र रुपये देणार असल्याचे सांगितले आहे.
संपादकीय भूमिकाकोणताही अभ्यास किंवा विचार न करता मतांसाठी सवलतींची आमिषे देणारे पक्ष निवडून आल्यावर कसा राज्यकारभार करणार ? |