राज्यघटना म्हणजे राहुल गांधी यांना पोरखेळ वाटला का ? – सौ. चित्रा वाघ, नेत्या, भाजप
मुंबई – राहुल गांधी, तुम्हाला राज्यघटना म्हणजे पोरखेळ वाटला का ? असा प्रश्न भाजपच्या नेत्या सौ. चित्रा वाघ यांनी केला आहे. भाजपकडून नागपूरमधील सभेतील राज्यघटनेच्या पुस्तकाचा एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता. यात हे पुस्तक कोरेच असल्याचे दिसले. त्यामुळे राज्यघटनेच्या कोर्या प्रती वाटल्याची टीका करण्यात आली.
चित्रा वाघ म्हणाल्या, ‘‘राहुल गांधी तुम्ही लोकसभा निवडणुकीपासून हातात राज्यघटना घेऊन ‘राज्यघटना वाचवा’ म्हणून जो काही कांगावा करत आहात, त्यातील खोटेपणा जनतेच्या कधीच लक्षात आला आहे; पण तुम्ही राज्यघटनेच्या कोर्या प्रती वाटून खोटी नाटी आश्वासने दिलीत. कोरी राज्यघटना छापणे हा आमच्या महामानवाचा अपमान आहे. तो आम्ही भारतीय सहन करणार नाही. राज्यघटना म्हणजे भारताचा आत्मा आहे. जनता तुम्हाला क्षमा करणार नाही.’’