आळंदीतील कार्तिकी यात्रा काळात भाविकांची असुविधा टाळणार ! – दौन्डे, प्रांताधिकारी

कार्तिकी यात्रेत आळंदीत २४ घंटे आरोग्य सेवा कार्यरत रहाणार !

आळंदी (जिल्हा पुणे) – येथील कार्तिकी यात्रेच्या यावर्षीच्या नियोजनावर आचारसंहितेचे सावट आहे. त्यासाठी आळंदी कार्तिकी यात्रा काळात राज्यातून आलेल्या भाविक, नागरिक यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत नागरि सेवा सुविधा पुरवण्यासाठी नियोजन पूर्व आढावा बैठकीत सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी प्रभावी कामकाज करावे. आळंदीत नागरिक, भाविक यांच्या सुरक्षेसह आरोग्याची काळजी घेत यात्रेत भाविकांना सेवा-सुविधा देतांना भाविकांची यात्रा काळात असुविधा होणार नाही, याची दक्षता घेण्याचे सूचनादेश, प्रभावी नियोजन आणि त्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना खेडचे प्रांत दौन्डे यांनी प्रशासनास दिल्या आहेत.

आळंदीत कार्तिकी यात्रा अर्थात् ‘माऊली’च्या संजीवन समाधीदिन सोहळ्याच्या सिद्धतेचा नियोजन पूर्व आढावा घेण्यासाठी प्रांताधिकारी दौन्डे यांच्या अध्यक्षतेखाली आळंदी नगर परिषद सभागृहात आढावा बैठक झाली. या वेळी प्रांत दौन्डे यांनी उपस्थित अधिकारी, पदाधिकारी, विविध संस्थांचे मान्यवर, नागरिक यांच्याशी सुसंवाद साधून आढावा घेत प्रशासनाला विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सूचना केल्या.