श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना नवरात्रीच्या दिवसांत पदार्थ बनवून देण्याची इच्छा होणे आणि प्रत्यक्षात त्याच सेवेसाठी साधिकेला बोलावणे
‘वर्ष २०२४ च्या नवरात्रीपूर्वी माझ्या मनात ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना नवरात्रीत काहीतरी खायचे पदार्थ बनवून देऊया’, असे विचार येत होते. त्यानुसार मी मानसरित्या त्यांना पुरणपोळी, गुलाबजाम, खीर, शिरा इत्यादी पदार्थ बनवून अर्पण करू लागले. त्यामुळे नवरात्र चालू होण्यापूर्वीच मला देवीला नैवेद्य दाखवल्याचा आनंद मिळू लागला.
आश्चर्य म्हणजे एका साधिकेने मला विचारले, ‘‘नवरात्रीच्या दुसर्या दिवसापासून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यासाठी महाप्रसाद बनवण्याच्या सेवेत साहाय्य करण्यासाठी येऊ शकता का ?’’ तेव्हा मला अपार आनंद झाला.
‘देवीला मनातील प्रत्येक विचार कसा कळतो आणि ती आपली प्रत्येक इच्छा कशी पूर्ण करते ?’, याची अनुभूती येऊन मला कृतज्ञता वाटली.’
– सौ. सोनाली रवींद्र पोत्रेकर, फोंडा, गोवा. (८.१०.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |