कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि लॉरेन्स बिष्णोई यांची छायाचित्रे असलेल्या टी-शर्ट आणि वस्तू ची विक्री !
मुंबई – कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि कारागृहात असणारा गुंड लॉरेन्स बिष्णोई यांची छायाचित्रे असलेले टी-शर्ट अन् वस्तू यांची उघडपणे विक्री होत आहे. या प्रकरणी सायबर गुन्हे विभागाकडून संबधित वस्तूंची ऑनलाईन विक्री करणार्या ‘ई कॉमर्स’ संकेतस्थळांवर पोलिसांकडून गुन्हे नोंदवण्यात येत आहेत.
🚨Worrisome Trend Alert!
T-shirts and merchandise featuring notorious gangsters like Dawood Ibrahim and Lawrence Bishnoi sold on eCommerce platforms including Meesho and Flipkart; Removed after social media outrage.
👉 Glorifying crime and violence has severe consequences,… pic.twitter.com/27lMmUQTBd
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 7, 2024
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, Flipkart, AliExpress, Tee Shopper आणि Etsy यांसारख्या अनेक ई-कॉमर्स संकेतस्थळांवरून ही विक्री करण्यात येत आहे. (या आस्थापनांवरही सरकारने गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात ते अशा प्रकारच्या वस्तूंची विक्री करणार नाहीत ! – संपादक)
संपादकीय भूमिकाअशा ‘टी-शर्ट’ आणि वस्तू यांची विक्री म्हणजे गुन्हेगारीचे उदात्तीकरण करण्याचाच प्रकार होय ! यांचे उत्पादन करणार्यांवर गुन्हा नोंदवून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद केला पाहिजे आणि त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, म्हणजे अन्य कुणी असे धाडस करणार नाही ! |