CM Yogi Appeals Maharashtra Elections: त्रेतायुगात बजरंगबली होते; पण इस्लाम नव्हता !

बजरंगबली मान्य नसणार्‍यांनी भारतातून निघून जाण्याचे केले आवाहन  

योगी आदित्यनाथ

अमरावती (महाराष्ट्र) – त्रेतायुगात बजरंगबली होते; पण इस्लाम नावाची कोणतीच वस्तू या पृथ्वीवर नव्हती. आज आपण हनुमान चालिसाचे पठण करत आहोत, श्रीरामनवमीला शोभायात्रा काढत आहोत; पण त्यांना प्रतिबंध घातला जात आहे. अडवणूक केली जाते. कशामुळे ? भारतात असा कोण भारतीय असेल की, जो प्रभु रामचंद्रांना मानत नसेल, बजरंगबलींना मानत नसेल ? ज्यांना बजरंगबली मान्य नाहीत, त्यांनी स्वतःला जे मान्य आहे, तेथे निघून जावे, असे विधान उत्तरप्रदेशातील भाजप सरकारचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. येथे निवडणुकीनिमित्त आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.

ही राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाची निवडणूक !

योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘‘ही राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाची निवडणूक आहे. आपले सर्वकाही देशाच्या नावे असायला हवे. प्रत्येक काम देशाच्या नावे करायला हवे. आपले व्यक्तीगत अस्तित्व नको. जे देशहिताचे आहे, तेच आपल्या हिताचे आहे. जे देशाच्या विरुद्ध आहे, ते आपल्याही विरुद्ध आहे. याच संकल्पासह आपण महाराष्ट्राची निवडणूक लढायची आहे. कुठल्याही परिस्थितीत देशात महायुतीचे सरकार आणायचे आहे.’’