Delhi Gang Rape : देहलीत महिलेवर सामूहिक बलात्कार !
|
नवी देहली – देहली पोलिसांच्या जुन्या मुख्यालयापासून काही मीटर अंतरावर महिला आणि गरीब यांच्यासाठी काम करणार्या ३४ वर्षीय महिलेवर ३ जणांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर एका रिक्शाचालकानेही तिला राजघाटजवळील गांधी स्मृती सर्व्हिस रोडवर नेऊन रिक्शामध्येच तिच्यावर बलात्कार केला. वारंवार बलात्कार झाल्याने महिलेचे मानसिक संतुलन बिघडले. ती अर्धनग्न अवस्थेत राजघाट येथून चालत सराय कालेखन येथे पोचली. महिलेच्या गुप्तांगांतून रक्त वाहात होते. या मार्गावरून जाणार्या सहस्रो वाहनांपैकी कुणीही तिला साहाय्य केले नाही. ही घटना ११ ऑक्टोबरच्या रात्री ९.३० च्या सुमारास घडली. आता ती समोर आली आहे.
🚨 Delhi ITO Gang Rape Case:
34-year-old woman researcher walks 2 kilometers in a semi-naked condition after being gang raped in Delhi.▫️ Undergoing treatment in AIIMS
▫️3 accused arrested after analysing footage of over 700 CCTV Cameras
👉 The Government should… pic.twitter.com/lRuRfw4FbE
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 8, 2024
येथे महिलेला पाहून नौदलाच्या अधिकार्याने पोलिसांना माहिती दिली. पोलीस अधिकार्यांनी सांगितले की, आम्हाला ही माहिती मिळाली नसती, तर महिलेचा मृत्यू झाला असता. एम्समध्ये महिलेवर शस्त्रकर्म करण्यात आले. तीव्र धक्क्यामुळे तिला सध्या एम्सच्या मानसोपचार विभागात भरती करण्यात आले आहे. पोलिसांनी सुमारे २१ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर रिक्शाचालक प्रभु, भंगार दुकानातील कामगार प्रमोद आणि शमशुल लगडा या ३ आरोपींना अटक केली आहे. आरोपींना अटक केल्यानंतर पीडित महिलेवर झालेला अत्याचार समोर आला.
संपादकीय भूमिकाअशा बलात्कार्यांना भर चौकात फाशीची शिक्षा देण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! अशा शिक्षा होऊ लागल्यानंतरच देशातील बलात्कारांच्या घटनांत घट होईल ! |