पुणे शहरात हत्तीच्या केसांचे दागिने विकणार्या सराफ पेढी चालकावर गुन्हा नोंद !
पुणे – वन्यजीव कायद्यान्वये बंदी असलेल्या हत्तीच्या केसांचे ‘ब्रेसलेट’ आणि अंगठ्यांची विक्री केली. या प्रकरणी कुमठेकर रस्त्यांवरील व्ही.आर्. घोडके या सराफ पेढीच्या चालकांच्या विरोधात विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. त्यांच्या दुकानांतून हस्तगत करण्यात आलेले दागिने पडताळणीसाठी वन विभागाच्या पथकाकडे सोपवण्यात आले आहेत. हत्तीचे केस बाळगणे, त्याची विक्री करणे हा कायद्याने गुन्हा आहे. या संदर्भात एका वन्यप्रेमी सामाजिक कार्यकर्त्याने पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली होती.