मदरसा संचालकाने भाऊबिजेला टिळा लावल्याने वाद
इस्लाममधून बाहेर फेकण्याचा फतवा !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – देशभरात ३ नोव्हेंबर या दिवशी भाऊबिजेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. उत्तरप्रदेशातील संभल जिल्ह्यात भाऊबीज साजरी करतांना भाजपच्या नेत्या आणि शिक्षणमंत्री गुलाब देवी यांनी मदरसा संचालक फिरोज खान याला टिळा लावल्याने वाद निर्माण झाला. या घटनेनंतर मौलाना इश्तिखार याने एक फतवा जारी केला, ज्यामध्ये त्याने टिळा लावणे अधार्मिक ठरवले आणि मदरसा संचालकाला इस्लाममधून बाहेर फेकण्याचा फतवा जारी केला. ‘मुसलमानाने टिळा लावणे ‘हराम’ असून ते इस्लामच्या विरोधात आहे’, असे मौलाना म्हणाले. ‘इस्लामच्या तत्त्वांचे पालन करणे महत्त्वाचे आहे आणि टिळा लावण्यासारख्या कृती इस्लामला कमकुवत करतात’, असे मौलाना म्हणाले.
मदरशाचे संचालक फिरोज खान याने कट्टरवाद्यांवर टीका केली होती. तसेच त्याने तमाम देशवासियांना भाऊबिजेच्या शुभेच्छा दिल्या होत्या.