कॅनडामधील हिंदु मंदिरावरील आक्रमणाचा हिंदु स्वयंसेवक संघ यू.एस्.ए.कडून निषेध !
मुंबई – हिंदु स्वयंसेवक संघ यू.एस्.ए.ने कॅनडाच्या ब्रँप्टन येथील हिंदु मंदिरावरील आक्रमणाचा निषेध केला आहे. कॅनडातील हिंदु समुदायाच्या सुरक्षेविषयी आणि मानवी हक्कांसाठी, तसेच देशभरातील मंदिरांसह हिंदु समुदायाच्या मालकीच्या मालमत्तेच्या सुरक्षेविषयीही चिंता व्यक्त केली आहे. ‘कॅनडातील कायदाव्यवस्था न्याय देऊन हिंसक कृत्यासाठी उत्तरदायींवर कारवाई करेल’, असा विश्वास संघाने व्यक्त केला.
Hindu Swayamsevak Sangh USA (@hssusa) condemns violent attack on Hindu Sabha temple in Brampton, Canada!
🔸Urges Canada Administration to take decisive action & ensure safety of Hindu community.
🔸Part of a worrying trend affecting North American Hindus.#BramptonTempleAttack… https://t.co/vUnIiORvJo
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 8, 2024
हिंदु स्वयंसेवक संघ यू.एस्.ए.ने म्हटले की,
१. न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्निया येथील मंदिरांवरील आक्रमणे पहाता ब्रँप्टनची घटना उत्तर अमेरिकेतील हिंदूंना प्रभावित करणार्या चिंताजनक प्रवृत्तीचा भाग आहे. हा आतंकवाद आणि द्वेषप्रेरित हिंसाचार यांना राजकीय अभिव्यक्ती म्हणून न्याय्य ठरवता येणार नाही. ते मानवी हक्कांचे, धार्मिक अल्पसंख्यांकांचे संरक्षण करण्यासाठी कायद्यांचे उल्लंघन आणि सामान्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करतात.
२. माध्यमे, शिक्षक, विचारवंत आणि ‘इन्फ्लुएन्सर’ (सामाजिक माध्यमांद्वारे प्रभाव निर्माण करणारे) यांना आवाहन आहे की, हिंदु समुदायाला लक्ष्य करणार्या आतंकवाद्यांच्या वाढत्या लाटेकडे लक्ष द्यावे. अमेरिकी समाजाला असलेला धोका ओळखून द्वेष अन् धर्मांधता यांचा निषेध करून शांततापूर्ण सहअस्तित्वावर आधारित संस्कृती वाढवण्याच्या दिशेने कार्य करावे.