देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना साधकाला ध्यानमंदिरातील देवतांविषयी सूक्ष्मातून मिळालेली माहिती
१७.८.२०२३ या दिवशी मी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करत होतो. त्या वेळी माझे मन एकाग्र झाले होते. तेव्हा ‘कुणीतरी मला ध्यानमंदिरातील देवतांविषयी माहिती सांगत आहे’, असे जाणवले. ‘हा आवाज कुठून येत होता ?’, ते मला समजले नाही. त्याविषयी येथे दिले आहे.
१. हनुमंत आणि श्री दुर्गादेवी यांनी त्यांचा डावा पाय भूमीवर ठेवला आहे. त्यातून ते मारक शक्ती पाताळात सोडत आहेत. ते अनिष्ट शक्तींना निस्तेज करून त्यांच्यातील मारकता नष्ट करत आहेत.
२. श्री गणपति आणि श्रीराम यांनी त्यांचा उजवा पाय भूमीवर ठेवला आहे. त्यांच्या उजव्या पायातून चैतन्य आणि तारक शक्ती भूमीवर पसरली आहे. ती पाताळातून येणार्या मारक शक्तींना थोपवून नष्ट करत आहे.
३. दत्तात्रेयांचे दोन्ही पाय भूमीवर असून ते त्यांच्या पदस्पर्शाने मुक्तीच्या वाटेवर असलेल्या पितरांना साधनामार्गाने मुक्ती देत आहेत.
४. श्रीकृष्ण (श्रीविष्णूचा अवतार) गुडघ्यापर्यंत भूगर्भात उभा आहे, म्हणजे त्यांचे तिन्ही लोकांत अस्तित्व आहे.
५. महादेव पद्मासनात बसल्यामुळे त्यांचे तळपाय उर्ध्व दिशेला आहेत. त्यामुळे वर आणि खाली असा समतोल राखला जात आहे.
६. श्री महालक्ष्मी देवी कमळामध्ये आहे, म्हणजे ती सर्व ठिकाणी असून सर्वांपासून अलिप्त आहे.
ही सर्व माहिती ऐकण्याची क्षमता देऊन ती माझ्याकडून लिहून घेतल्याबद्दल हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), आपल्या चरणी कोटीशः साष्टांग दंडवत !’
– श्री. नंदकिशोर दत्तात्रेय नारकर (वय ६९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.८.२०२३)
|