Suspicious Death Of Couple : हिंदु मुलगा आणि मुसलमान मुलगी असलेल्या प्रेमी युगुलाचा संशयास्पद मृत्यू !
उत्तरप्रदेशाच्या बुलंदशहर येथील घटना !
बुलंदशहर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमध्ये हिंदु मुलगा आणि मुसलमान मुलगी असलेल्या एका प्रेमी युगुलाच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. मृत १८ वर्षांची मुसलमान मुलगी आणि २१ वर्षांचा हिंदु मुलगा अनेक वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत होते. या प्रेम प्रकरणाला मुलीच्या घरच्यांचा तीव्र विरोध होता. दोघांचेही मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळले.
सहा महिन्यांपूर्वी या दोघांचे प्रेम प्रकरण स्याना पोलीस ठाण्यात पोचले होते. पोलीस निरीक्षक प्रेमचंद शर्मा यांनी सांगितले की, मे २०२४ मध्ये हे प्रेमी युगुल घरातून पळून गेले होते. यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी त्यांच्या मुलीचे हिंदु मुलाने अपहरण केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी मुलाला अटक करण्यात आली होती आणि त्याला महिनाभर कारागृहात रहावे लागले होते.
या घटनेची माहिती देतांना बुलंदशहरचे पोलीस अधीक्षक शंकर प्रसाद यांनी सांगितले की, दोघांचेही मृतदेह घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. दोन्ही कुटुंबियांकडून तक्रारी करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पोलीस अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाया मृत्यूमागे कोण आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही, अशीच हिंदु जनतेची भावना आहे ! उत्तरप्रदेश पोलिसांनी संबंधितांना अटक करून कठोर कारवाई केली पाहिजे, अशी हिंदूंची मागणी आहे ! |