नितेश राणे आणि हिंदू यांच्या विरोधात गरळ ओकणार्‍यांचे पाय विधान भवनाकडे वळण्याआधीच कलम केले जातील ! – भाजपचे माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे

भाजपचे माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांची चेतावणी !

डावीकडून नासीर सिद्दीकी आणि नारायण राणे

मुंबई – एम्.आय.एम्.चे औरंगाबाद मध्यचे उमेदवार नासीर सिद्दीकी यांनी त्यांच्या जाहीर भाषणातून आमदार नितेश राणे यांना विधानसभेत घुसून मारण्याची धमकी दिली होती. हा तोच पक्ष आहे, ज्याच्या प्रमुखांनी एकेक मुसलमान २० हिंदूंना भारी पडेल, असे सांगितले होते. निजामशाहीच्या पाठीराख्यांनी लक्षात ठेवावे की, देशात आता लांगूलचालन करणार्‍यांचे सरकार नसून बहुसंख्यांचे हितरक्षण करणारे सरकार आहे. नितेश राणे आणि हिंदू यांच्या विरोधात गरळ ओकणार्‍यांचे पाय विधान भवनाकडे वळण्याआधीच कलम केले जातील, अशा स्वरूपाची पोस्ट सामाजिक माध्यमावरून प्रसारित करून भाजपचे माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी नासीर सिद्दीकी यांना  प्रत्युत्तर दिले.

एम्.आय.एम्.ने छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवार दिला असून नासीर सिद्दिकी यांच्यासाठी अकबरुद्दीन ओवैसी यांनी प्रचारसभा घेतली. त्यात बोलतांना सिद्दिकी यांनी नितेश राणे यांचे नाव न घेता धमकी दिली होती.