Akbaruddin Owaisi Hate Speech : अकबरुद्दीन ओवैसी यांच्याकडून भाषणात पुन्हा ‘१५ मिनिटां’चा उल्लेख !
छत्रपती संभाजीनगर – येथे निवडणूक प्रचारासाठी आलेले एम्.आय.एम्. पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांच्याकडून भाषणात पुन्हा १५ मिनिटांचा उल्लेख करण्यात आला आहे. या वेळी त्यांनी सांगितले की, ‘१०.४५ वाजले आहेत. अजून १५ मिनिटे शेष आहेत. धीर धरा, ती (१५ मिनिटे) माझी पाठ सोडायला सिद्ध नाही आणि मीही तिला सोडण्यास सिद्ध नाही.’
Stand Up Against Hate Speech!
Akbaruddin Owaisi hints at his infamous hate speech by referring to ’15 minutes’, at the Maharashtra election rally in Chhatrapati Sambhaji Nagar.
This isn’t the first time Owaisi has been embroiled in controversy. Is he ridiculing the system, and… pic.twitter.com/SV79QEXNMk
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 6, 2024
अकबरुद्दीन ओवैसी यांनी वर्ष २०१२ मध्ये ‘तुम्ही १५ मिनिटांसाठी पोलीस बाजूला हटवा, २५ कोटी मुसलमान १०० कोटी हिंदूंना भारी पडतील’, असे हिंदूंना चिथावणारे विधान केले होते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला होऊन कारागृहात गेले होते. नंतर न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.
संपादकीय भूमिकाअसे विधान करून ओवैसी हे काय सुचवू इच्छित आहेत. पुन्हा ही हिंदूंना धमकी समजायची का ? ओवैसी यांना या प्रकरणात पूर्वी निर्दोष ठरवण्यात आले आहे. आता पुन्हा तसेच विधान केल्यानंतर पोलिसांनी चौकशी करून कारवाई केली पाहिजे ! |