मुसलमान महिला उमेदवाराने मंदिरात पूजा केल्यावरून मौलानाला उठले पोटशूळ !
|
(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक, विद्वान)
कानपूर (उत्तरप्रदेश) – महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभांसाठीच्या निवडणुका होत असतांना उत्तरप्रदेशातील विधानसभेच्या ९ जागांवरही पोटनिवडणूक होत आहे. कानपूर शहरातील सीसामऊ मतदारसंघाचाही यात समावेश आहे. येथील समाजवादी पक्षाच्या महिला उमेदवार नसीम सोलंकी यांनी दिवाळीत शिवमंदिरात प्रार्थना करत दीपप्रज्वलन केल्याचे समोर येताच येथील मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन यांनी टीका केली आहे. मौलाना म्हणाले की, इस्लाममध्ये मूर्तीपूजा निषिद्ध आहे. जर कुणी स्वेच्छेने अशी पूजा करत असेल, तर त्याला कठोर नियम लागू होतात. जर महिलेने अजाणतेपणी असे केले असेल, तर ती शरीयतच्या दृष्टीने ती दोषी आहे. तिला पश्चात्ताप झाला पाहिजे.
१. नसीम यांचा एक व्हिडिओ प्रसारित झाला होता. यात त्या शिवलिंगावर जलाभिषेक आणि फुले अर्पण करतांना दिसत आहेत. तसेच शिवाला प्रार्थनाही करत आहेत.
२. शिवमंदिराच्या पुजार्यांनी मुसलमानाने मंदिरात पूजन केल्याने नंतर हरिद्वारहून गंगाजल मागवून संपूर्ण मंदिर आणि शिवलिंग धुतले.
३. नसीम सोलंकी यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले की, मी प्रत्येक धर्माचा आदर करते. दिवाळीच्या निमित्ताने मंदिरात बोलावण्यात आले होते आणि मी त्या ठिकाणी गेले. मंदिराला भेट दिल्यानंतर मी गुरुद्वारातही गेले होते.
संपादकीय भूमिकाधर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारून हिंदूंना वेठीस धरणारे आता यावरून मौलानांना काही बोलतील का ? |