मालवण शहरातील अनधिकृत फळविक्रेत्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी

मालवण – येथील एस्.टी. बसस्थानकाजवळ एक फळविक्रेता गुटखा खाऊन फळांवर थुंकतांना सापडला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन येथील पोलीस ठाण्यात अधिकृत नोंद असलेल्या, तसेच अधिकृत परवाने असणार्‍या व्यक्ती वगळता सर्व अनधिकृत फळविक्रेत्यांवर सरसकट कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहरातील तरुणांनी पोलीस आणि मालवण नगरपरिषद प्रशासन यांना दिले आहे.

एस्.टी. बसस्थानकाजवळ फळविक्रेत्याकडून घडलेल्या प्रकारामुळे फळविक्रेत्यांविषयीची नागरिकांची विश्वासार्हता अल्प झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न उद्भवला आहे. फळविक्रेते शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर हातगाडी लावून फळे विकतात. त्यामुळे वाहतूक कोंडीच्या त्रासाला मालवणवासियांना सतत सामोरे जावे लागते. अधिकृत फेरीवाले किती ? याची कुणालाच माहिती नसते. भविष्यात असे प्रकार घडत राहिल्यास नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू शकतात. त्याआधीच प्रशासनाने सर्व अनधिकृत फळ विक्रेत्यांच्या विरोधात सरसकट कारवाई करावी. ही कारवाई दिखाऊ असू नये, तर कठोर स्वरूपात असावी. जेणेकरून असे प्रकार पुन्हा होणार नाहीत. अशी कारवाई केल्यास मालवणमधील रस्तेदेखील वाहतूक कोंडीतून मुक्त होतील, असे या निवेदनात म्हटले आहे.