उपाशीपोटी व्यायाम करावा का ?
निरोगी जीवनासाठी व्यायाम – भाग २४
या लेखाच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/850049.html
‘रिकाम्यापोटी व्यायाम केल्याने शरिरात ऊर्जेसाठी अधिक प्रभावीपणे चरबी वापरली जाते’, अशी रिकाम्यापोटी व्यायाम
करण्यामागील कल्पना असून ते केवळ अर्धसत्य आहे. रिकाम्यापोटी व्यायाम केल्याने अधिक प्रमाणात चरबी न्यून (कॅलरीज् बर्न) होत असली, तरी लवकर थकवा येऊन व्यायामाची एकूण फलनिष्पत्ती न्यून होऊ शकते.
जेव्हा आपण उपाशीपोटी व्यायाम करतो, तेव्हा आपल्या शरिरात ऊर्जेसाठी कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स – Carbohydrates) सहज उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला लवकर थकवा येऊ शकतो. त्यामुळे व्यायामाची तीव्रता आणि कालावधी न्यून होतो. याउलट व्यायामापूर्वी संतुलित; पण हलका अल्पाहार घेतल्यास शरिराला सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळते.
सामान्यतः कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स) आणि प्रथिने (प्रोटीन्स) असलेला अल्पाहार आपल्याला अधिक प्रभावीपणे अन् दीर्घ कालावधीसाठी व्यायाम करण्यास सक्षम करतो. वजन न्यून करू इच्छिणार्यांसाठी हे महत्त्वाचे आहे.’
– कु. वैदेही शिंदे, भौतिकोपचार (फिजिओथेरपी) अभ्यासक, फोंडा, गोवा. (३०.९.२०२४)
या लेखाच्या यापुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/852336
निरोगी जीवनासाठी ‘व्यायाम’ या सदरात प्रसिद्ध होणारे सर्व लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/tag/exercise