सातारा येथे चारचाकीतून ९५ लाख रुपयांची रोकड जप्त !
सातारा – येथे पुणे-बेंगळुरू महामार्गावर वाहनांच्या पडताळणीत चारचाकीत ९५ लाख रुपयांची रोकड पोलिसांना सापडली आहे. ही रोकड कुणाची आहे ? याचा पोलीस शोध घेत आहेत. रोकड कह्यात घेतली असून मनोज गोयल आणि दिपू चव्हाण यांना कह्यात घेतले आहे. ही रक्कम मुंबई येथून कोल्हापूर येथे नेत असल्याचे सांगितले असून मालकाचे नाव मुकेश कस्तुरचंद्र देवरा आहे.