आमचे सरकार आल्यावर पुढची ५ वर्षे जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू ! – उद्धव ठाकरे
कोल्हापूर – राज्यातील मुलींना राज्य सरकार विनामूल्य उच्चशिक्षण देणार आहे. त्याही पुढे जाऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आम्ही राज्यातील मुलांनाही विनामूल्य शिक्षण देऊ; कारण दोघेही तितकेच महत्त्वाचे आहेत. मुलगा आणि मुलगी दोघेही महाराष्ट्रासाठी आधारस्तंभ आहेत. ज्याप्रमाणे मनोहर जोशी मुख्यमंत्री असतांना ५ वर्षांत जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर होते, त्याप्रमाणे आमचे सरकार आल्यावर पुढची ५ वर्षे डाळ, तेल, साखर, तांदूळ यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू, असे आश्वासन राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
ते राधानगरी-भुदरगड मतदारसंघात के.पी. पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत बोलत होते. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ‘‘राज्यातील महिला पोलिसांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे आमच्या माता-भगिनी यांच्यावर झालेल्या अन्यायाची नोंद कोण घेणार ? त्यासाठी उपाययोजना म्हणून महिलांसाठी शिपाई पदापासून ते अधिकार्यांपर्यंत सर्व पदे भरणार, तसेच स्वतंत्र महिला पोलीस ठाणेही उभारले जाईल.’’