कॅनडा येथील मंदिरावरील आक्रमण निषेधार्ह ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा
पणजी, ५ नोव्हेंबर (वार्ता.) – ब्रॅप्टन, कॅनडा येथील हिंदु सभा मंदिरात खलिस्तान समर्थकांनी ३ नोव्हेंबर या दिवशी घुसून हिंदु भाविकांवर आक्रमण केले. ही घटना म्हणजे शांती, एकमेकांचा आदर राखणे आणि एकसंघ रहाणे, या तत्त्वांवर केलेले आक्रमण आहे. या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो, असे मत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्या ‘एक्स’ खात्यावर व्यक्त केले आहे. कॅनडा येथे मंदिरावरील खलिस्तान समर्थकांनी केलेल्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे मत व्यक्त केले आहे.
ते पुढे म्हणतात, ‘‘असे आक्रमण होणे, ही एक चिंतेची गोष्ट आहे आणि अस्वीकारार्ह आहे. कॅनडा सरकारने तेथील सर्व धर्मियांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे.’’