अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्ष भारताला लक्ष्य करणारा !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने जाता जाता अनेक भारतीय कंपन्यांवर निर्बंध लावले. कारण ? रशियाशी व्यवहार केला म्हणून…कमला हॅरिस राष्ट्राध्यक्षा झाल्या, तर हेच धोरण पुढे चालू राहील, अशी शक्यता आहे. यापूर्वी वर्ष १९९८ मध्येही डेमोक्रॅटिक पक्ष अमेरिकेत सत्तेत असतांना भारतावर आर्थिक निर्बंध लावले होते. जे वर्ष २००२ मध्ये रिपब्लिकन पक्षाने उठवले. तुलनेने रिपिब्लकन पक्ष भारतासाठी नेहमीच सकारात्मक राहिला आहे. डेमोक्रॅटिक पक्ष पाकधार्जिणा आणि मानव अधिकारावरून भारताला ‘टार्गेट’ (लक्ष्य) करणारा ठरला आहे. कमला हॅरिस राष्ट्राध्यक्षा झाल्या आणि त्या भारतीय वंशाच्या आहेत म्हणून फार मोठा भेद जाणवणार नाही.
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरणांचे विश्लेषक, पुणे. (३.११.२०२४)