सध्याच्या काळात प्रत्येकाने योग्य साधनेसह नामजप केला पाहिजे ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था
रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन
कोल्हापूर, ५ नोव्हेंबर (वार्ता.) – पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत होती. त्यामुळे मुलांवर संस्कारही आपोआप होत होते. स्वातंत्र्यानंतरच्या काळात सर्व परिस्थिती पालटली असून आज कुठेही हिंदु धर्माविषयी ज्ञान दिले जात नाही. कोरोना संसर्गाच्या काळात लोकांना विज्ञानाची मर्यादा लक्षात आली आणि अनेक जण अध्यात्माकडे वळले. यापुढील काळ हा भयंकर असून त्यातून तरून जाण्यासाठी प्रत्येकाने योग्य साधनेसह नामजप केला पाहिजे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. या प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते.
सनातन संस्थेचे साधक आणि सुप्रसिद्ध त्वचारोगतज्ञ डॉ. मानसिंग शिंदे यांचा मुलगा त्वचारोगतज्ञ डॉ. अपूर्व शिंदे यांच्या राजारामपुरी ५ वी गल्ली येथील अत्याधुनिक ‘त्वचारोग आणि हेअर ट्रान्सप्लांट’ रुग्णालयाचे उद्घाटन सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. या उद्घाटनप्रसंगी डॉ. (सौ.) रजनी शिंदे, डॉ. (कु.) मनाली शिंदे याही उपस्थित होत्या. या वेळी डॉ. अपूर्व शिंदे म्हणाले, ‘‘माझे वडील डॉ. मानसिंग शिंदे यांनी उपचार करतांना ज्याप्रकारे रुग्णांशी जवळीक साधून सर्वाेत्तम उपचार दिले, तोच वारसा पुढे चालवत मी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करीन.’’