आज ‘पांडवपंचमी’ आहे. त्या निमित्ताने…

पांडवपंचमी

पांडवांचे स्वर्गारोहण दाखवणारे प्रतीकात्मक चित्र

पांडव पंचमीस ‘ज्ञानपंचमी’, ‘लाभपंचमी’ आणि ‘कडपंचमी’, अशी नावे आहेत. पृथ्वीचे राज्य मिळूनही पांडवांना हे ज्ञान झाले की, कधी ना कधी हा इहलोक सोडावाच लागतो; म्हणून स्वर्गारोहणासाठी पांडवांनी प्रस्थान ठेवले. तो दिवस कार्तिक शुक्ल पंचमीचा होता; म्हणून त्याला ‘पांडवपंचमी’ म्हणतात. ‘देहाला विराम हा कधी ना कधी तरी द्यावाच लागतो’, हे ज्ञान पांडवांना त्या दिवशी झाले; म्हणून त्याला ‘ज्ञानपंचमी’, असेही म्हणतात आणि दिवाळीचा उत्सव सरत आला; म्हणून या दिवसाला ‘कडपंचमी’, असे म्हटले जाते.

– सौ. प्रज्ञा कुलकर्णी, डोंबिवली.

(साभार : मासिक ‘आदिमाता’, दीपावली विशेषांक)