‘बटेंगे तो कटेंगे’ ही पक्षाची भूमिका नाही ! – पंकजा मुंडे, आमदार, भाजप
पुणे – ‘बटेंगे तो कटेंगे’ हे काय सूत्र आहे का ? असे संदेश कुणीही सामाजिक माध्यमांवर टाकतो. ही आमच्या पक्षाची भूमिका नाही. कुणीही जाती-धर्माचे राजकारण करू नये. आम्ही केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विकासकामांच्या बळावर निवडणुकीला सामोरे जात आहोत, असे स्पष्टीकरण भाजपच्या नेत्या आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले. भाजपच्या ‘पश्चिम महाराष्ट्र मीडिया सेंटर’ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या.
मुंडे-पालवे पुढे म्हणाल्या, ‘‘लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकांनी भाजप सत्तेत आल्यास राज्यघटना पालटणार, जाती-धर्मामध्ये तेढ वाढवणार’, असे ‘फेक नॅरेटिव्ह’ वापरले होते. त्याचा फटका महाराष्ट्रामध्ये बसला; परंतु आता जनतेला वस्तूस्थिती लक्षात आल्याने विरोधकांचे ‘फेक नॅरेटिव्ह’ चालणार नाही.