रावेत (पुणे) येथील ‘हिट अँड रन’ प्रकरणातील मोटारचालकाला अटक !
पुणे – लक्ष्मीपूजनादिनी रावेत येथील ‘फॅलेसिटी सोसायटी’च्या प्रवेशद्वारासमोर फटाके फोडणारा संगणक अभियंता सोहम पटेल याला भरधाव मोटारीने धडक दिली. या अपघातामध्ये सोहमचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेला मोटारचालक आदित्य भोंडवे याला रावेत पोलिसांनी ४ नोव्हेंबर या दिवशी अटक केली. या प्रकरणी वैदेही सोहम पटेल यांनी तक्रार प्रविष्ट केली होती.
अपघातानंतर मोटारचालक आदित्य हा घटनास्थळी न थांबता गाडीसह पसार झाला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रावेत पोलिसांनी परिसरातील ८० सीसीटीव्हींचे चित्रीकरण पडताळले. त्यातून आरोपीचा शोध लागला.