रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करतांना साधिकेला आलेली अनुभूती
३ ते ७.२.२०२४ या कालावधीत मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी आले होते. त्या वेळी ध्यानमंदिरात नामजप करतांना मला आलेली अनुभूती येथे दिली आहे.
१. ध्यानमंदिरात नामजप करतांना डोळ्यांसमोर अकस्मात् निळसर आकाशी रंगाचा प्रकाश दिसणे आणि ‘श्रीकृष्ण हातात बासरी घेऊन उभा आहे’, असे दिसणे
‘मी ध्यानमंदिरात नामजप करण्यासाठी बसले होते. तेव्हा मी नामजप श्वासाला जोडण्याचा प्रयत्न करत होते. त्या वेळी माझ्या डोळ्यांसमोर अकस्मात् निळसर आकाशी रंगाचा प्रकाश दिसत होता. काही वेळाने मला ‘श्रीकृष्ण हातात बासरी घेऊन उभा आहे’, असे दिसू लागले.
२. ‘साधिकेला हवेत तरंगत आहे’, असे जाणवणे आणि शरिराला कंप सुटणे अन् त्याच भावस्थितीत श्रीकृष्णाने अनुभूती देणे
‘नंतर मी वर जात असून हवेत तरंगत आहे’, असे मला जाणवत होते. माझ्या पूर्ण शरिराला कंप सुटला होता. माझी भावजागृती होत होती. ‘मी त्याच भावस्थितीत राहून श्रीकृष्णाला अनुभवावे’, असे मला वाटत होते.’ श्रीकृष्णाने ही अनुभूती दिल्याबद्दल मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
– कु. काजल वाघ, पुणे (५.४.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |