‘शिबिरा’साठी आलेल्या साधिकेला चैतन्यमय अशा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आलेल्या अनुभूती !
फेब्रुवारी २०२४ मध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात एक ‘शिबिर’ पार पडले. त्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. लादीवर श्रीकृष्णाचे चित्र दिसणे
‘शिबिरासाठी गेल्यावर आम्हाला रामनाथी आश्रम दाखवण्यात आला. तेव्हा मुख्य दाराने आत जातांना मला लादीवर श्रीकृष्णाचे चित्र दिसत होते. मला असे वाटले की, ‘श्रीकृष्ण स्वयं प्रकट झाला आहे !’
२. ‘भिंत सजीव असून ‘श्रीकृष्ण समवेत आहे’, असे जाणवणे
आश्रमात फिरत असतांना भिंतीला हात लावल्यावर ‘श्रीकृष्ण माझ्या समवेत आहे’, असे मला त्या स्पर्शातून जाणवले. भिंतीला हात लावल्यावर मला ‘समुद्राच्या लाटांप्रमाणे काहीतरी हलत आहे’, असा अनुभव आला आणि ‘भिंत सजीव आहे’, असे मला जाणवले. (ही वायूतत्त्वाची अनुभूती आहे. – संकलक)
३. ध्यानमंदिरात नामजप करतांना शंकराला प्रार्थना केल्यावर शंकराचे दर्शन होणे
एकदा ध्यानमंदिरात बसून मी नामजप करत होते. तेव्हा डोळे बंद केल्यावर मला महादेवाचे रूप दिसले. मी प्रार्थना केली की, ‘हे शिवशंकरा, माझ्यासमोर या अन् मला दर्शन द्या !’ तेव्हा मला शंकराचे दर्शन झाले. त्यांचे दर्शन झाल्यावर माझ्या डोळ्यांतून अश्रू आले. ‘नामजपात किती शक्ती आहे. आपण मनापासून नामजप केला, तर देव आपली प्रार्थना ऐकून दर्शन देतो’, हे मला समजले. नामजप करतांना माझी भावजागृती झाली.’
– कु. निकिता भोसले (वय १८ वर्षे), पुणे (फेब्रुवारी २०२४ )
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |