भाजप संपवण्याची भाषा करणार्या अब्दुल सत्तार यांच्या प्रचारावर बहिष्कार ! – कमलेश कटारीया, भाजप
छत्रपती संभाजीनगर – महायुतीचे उमेदवार असलेले अब्दुल सत्तार हे नेहमी भाजप संपवण्याची भाषा करतात. भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंद करणे यांसह अनेक वेळा ते कार्यकर्त्यांना धमकी देतात. अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात उघडपणे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केला आणि निवडून आल्यावर त्यांचा सत्कार केला. याखेरीज त्यांच्याविषयी सामान्य नागरिकांना त्रास देणे यांसह अनेक तक्रारी आहेत. ‘अगोदर राष्ट्रहित’, असे भाजप पक्षाचे धोरण असल्याने अब्दुल सत्तार यांच्यासारख्या प्रवृत्तीला थारा देणे आम्हाला योग्य वाटत नाही. या संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिले असून भाजप संपवण्याची भाषा करणार्या अब्दुल सत्तार यांच्या प्रचारावर बहिष्कार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे सिल्लोड शहराध्यक्ष कमलेश कटारीया यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिली आहे.