UP Siddharthnagar Stone pelting : देवतांच्या मूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीवर मुसलमानबहुल भागात दगडफेक

  • सिद्धार्थनगर (उत्तरप्रदेश) येथील घटना

  • दगडफेकीची घटना अफवा असल्याचा पोलिसांचा दावा

सिद्धर्थनगर (उत्तरप्रदेश) – येथे ४ नोव्हेंबरला हिंदूंनी श्री गणेश आणि श्री लक्ष्मीदेवी यांच्या मूर्तींची विसर्जन मिरवणूक काढली होती. ही मिरवणूक मुसलमानबहुल माळी मैन्हा गावातून जात असतांना मिरवणुकीत ‘डीजे’वर भजन लावण्यात आले होते. त्याला विरोध करत मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. यात २ महिला भाविक घायाळ झाल्या. यामुळे येथे तणाव निर्माण झाला. याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी मोठा फौजफाटा घेऊन पोचले. त्यांनी भाविकांना समज देऊन शांत केले. यानंतर मिरवणूक निश्‍चित मार्गाने विसर्जनासाठी पुढे सरकली; मात्र दगडफेक करणार्‍या आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यावर भाविक ठाम राहिले.

पोलिसांनी दगडफेक वृत्ताला केवळ अफवा म्हटले

एका व्यक्तीला कह्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे पोलिसांनी दगडफेक आणि भाविक घायाळ झाल्याच्या वृत्ताला केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. अफवा पसरवणार्‍यांचा शोध चालू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

संपादकीय भूमिका

  • मुसलमानबहुल भागात सातत्याने हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर आक्रमणे होत असतांना त्या रोखण्यासाठी कुणीच का प्रयत्न करत नाही ? जिहादी आतंकवादाच्या घटना देशात काही प्रमाणात थांबल्या असतांना हा जिहाद कधी थांबणार ?
  • पोलीस दगडफेकीला अफवा ठरवून काय साध्य करू पहात आहेत ? उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना हिंदूंना पोलिसांकडून ही अपेक्षा नाही !