फटाक्यांच्या धुराच्या त्रासामुळे ८ श्वान, तर २३ पक्षी घायाळ !
मुंबईतील प्रकार !
मुंबई – दिवाळीच्या ४ दिवसांत मुंबई आणि तेथील परिसरात फटाक्यांच्या धुराचा त्रास झाल्याने, तसेच भाजल्याने ८ श्वान, तर २३ पक्षी घायाळ झाले आहेत. (याला उत्तरदायी असणार्यांना खडसवायला हवे ! – संपादक) गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्राणी आणि पक्षी घायाळ होण्याच्या घटना काही प्रमाणात उणावल्या आहेत.
💥Firecracker smoke fatally affects 8 dogs and 23 birds in #Mumbai and surrounding areas.
👉 Although it’s true that firecrackers cause air pollution, and scare off animals and birds, in some cases even costing them their lives, it is equally true that such statistics are… pic.twitter.com/FdBr3Fwyk1
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 5, 2024
श्वसनाचा त्रास होऊन घायाळ झालेल्यांमध्ये १५ कबुतरे, ६ घारी आणि २ घुबड यांचा समावेश आहे. काही श्वानांच्या पाठीवर फटाके फोडण्यात आले. (ही आहे मानवाची संवेदनशून्यता ! – संपादक) त्या श्वानांना भाजलेल्या अवस्थेत रुग्णालयात भरती करावे लागले. किरकोळ घायाळ झालेले पक्षी आणि श्वान यांच्यावर उपचार करून त्यांना सोडण्यात आले, अशी माहिती परळ येथील ‘दी बाई साकरबाई दिनशॉ पेटिट हॉस्पिटल फॉर अॅनिमल’ रुग्णालयाचे (बैलघोडा रुग्णालय) व्यवस्थापक डॉ. मयूर डांगर यांनी दिली.
संपादकीय भूमिका
|