Dombivli Cracker Bomb Attack On Hindu : डोंबिवली (ठाणे) : धर्मांधांनी पेटता सुतळी बाँब हिंदूच्या अंगावर फेकला !

२ हिंदु भावांना मारहाण !

डोंबिवली (ठाणे) – येथील ९० फुटी रस्त्यावरील कचोरे येथे रात्री १०.३० वाजता धर्मांधांनी दुचाकीस्वार हिंदूच्या अंगावर पेटता सुतळी बाँब फेकला. या बाँबमुळे दुचाकी बंद पडली. ‘किमान बघून फटाके फोडा’, असे हिंदूने सांगताच धर्मांधांनी त्याला मारहाण केली, तर त्याच्या भावाला लोखंडी गजाने मारले. या प्रकरणी ओमकार केशव पवार (वय १८ वर्षे) यांनी तक्रार दिली आहे. गणेश पवार हे त्यांचे बंधू आहेत. मोगीस खान (वय २४ वर्षे) आणि वसीम पटेल (वय २४ वर्षे) अशी आक्रमणकर्त्यांची नावे आहेत. त्यांनी पवार यांना शिवीगाळ केली, तसेच मारहाणही केली. मारहाण करणार्‍यांमध्ये इस्माईल खान, आयुब खान, युसुफ खान आणि युनुस खान यांचाही समावेश आहे.

१. ‘दोन भावांना वाचवण्यासाठी कुणी पुढे आल्यास त्यांना संपवू’, अशी धमकीही खान आणि पटेल यांनी दिली. (अशांवर पोलीस कधी जरब बसवणार ? – संपादक) त्यामुळे त्यांच्या दहशतीने परिसरातील नागरिक घाबरले. तेथे पळापळ चालू झाली. व्यापार्‍यांनी दुकाने बंद केली. (असे नेभळट हिंदू काय कामाचे ? – संपादक)

२. ओमकार पवार यांचे परिचित तेथे आल्याने त्यांनी जमावाच्या कह्यातून ओमकार यांची सुटका केली. गणेश यांच्यावर लोखंडी सळईने आक्रमण झाल्याने त्यांना कळवा येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.

३. मोगीस खान याने ‘हिंदूंनी हातात दांडके घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. तसेच आमच्यासह आमच्या कुटुंबियांना मारहाण करून दुखापत केली’, अशी विरुद्ध तक्रार टिळकनगर पोलीस ठाण्यात केली आहे. (‘चोर तो चोर वर शिरजोर’, या वृत्तीचे धर्मांध ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • हिंदूबहुल डोंबिवलीतील हिंदूंनी या घटनेच्या विरोधात संघटित होऊन धर्मांधांना वेळीच खडसवले असते, तर त्यांचे पुन्हा कधी असे करण्याचे धाडस झाले नसतेे !
  • हिंदूंना जिवंत जाळू पहाणार्‍या धर्मांधांना सरकारने फासावर लटकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !