दिवाळीनंतर पुणे आणि मुंबई या शहरांमधील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळली !
पुणे – दिवाळीच्या दिवसांमध्ये होणार्या आतषबाजीमुळे दिवाळीनंतर पुणे आणि मुंबई या शहरांमधील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळल्याचे समोर आले आहे. पुणे शहरातील हडपसर भागात तर हवा धोकादायक पातळीवर पोचली आहे. यामुळे नागरिकांचे श्वसनाचे आजार बळावण्याचा धोका आहे. पुणे येथील भूमकरनगर, लोहगाव येथील म्हाडा कॉलनी येथे हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक १५० पेक्षा अधिक आहे, तसेच शिवाजीनगर, कर्वे रस्ता, हडपसर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे तो २५० पेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक २०१ ते ३०० या दरम्यान असेल, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात आणि ३०० पेक्षा अधिक असल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.