साधिकेला स्वप्नात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाल्यावर तिचा आध्यात्मिक त्रास दूर होणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘मला होणार्‍या आध्यात्मिक त्रासात वाढ झाली होती. मला रात्री झोपतांना पाय पूर्ण गळून गेल्यासारखे जाणवत असे. मला पाय हलवताही यायचे नाहीत. मला झोप येत नसे. मी पायांना गोमूत्र लावून नामजपादी उपाय करत असे. मला असा त्रास दीड मास झाला.

५.२.२०२४ या दिवशी मला एक स्वप्न पडले. मी स्वप्नात प.पू. डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव पाहिला आणि मला त्यांचे दर्शन झाले. दुसर्‍या दिवशी मी सकाळी झोपेतून उठल्यावर ‘माझ्या पायाचा त्रास दूर झाला आहे’, असे मला जाणवले. तेव्हापासून मला पायदुखीचा त्रास झालाच नाही.

‘प.पू. डॉक्टरांच्या केवळ स्वप्नातील दर्शनाने माझा त्रास दूर झाला’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते. ‘प.पू. डॉक्टरांची माझ्यावर अशीच कृपादृष्टी असावी’, अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते.’

साधिकेने केलेला दत्ताचा नामजप दत्तगुरुंपर्यंत पोचल्याच्या संदर्भात तिला आलेली प्रचीती 

कु. मानसी प्रभु

‘एकदा मी नेहमीप्रमाणे दत्ताचा नामजप करून अभ्यास केला. त्या रात्री मला स्वप्नात दिसले, ‘मी एके ठिकाणी गेले आहे. तिथे दत्ताचे एक सुंदर मंदिर होते. मी मंदिरात असणार्‍या सुंदर अशा दत्ताच्या मूर्तीकडे पहात होते. तेव्हा माझे मन निर्विचार झाले. मला पुष्कळ शांत वाटले. त्या वेळी तिथे एक साधिका आली आणि मला बोलावून घेऊन गेली.’ मला दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर स्थिरता आणि आनंद जाणवत होता.

‘दत्तगुरु माझ्या स्वप्नात आले, म्हणजे माझा नामजप दत्तगुरुंपर्यंत पोचला’, असे मला जाणवले.’

– कु. मानसी प्रभु, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.३.२०२४)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक