रायगड जिल्ह्यात वर्‍हाड आणि टाटाचा माळ येथे हिंदु जनजागृती समितीकडून व्यापार्‍यांचे प्रबोधन !

हलालमुक्त दिवाळी अभियान !

जांभूळपाडा

पनवेल – यंदा दीपावलीच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हलालमुक्त दिवाळी’ हे अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत राज्यातील किराणा दुकानांचे मालक, ‘मॉल’चे व्यवस्थापक, किराणा मालाची विक्री करणार्‍या सहकारी संस्थांचे व्यवस्थापक, लोकप्रतिनिधी आदींच्या गाठीभेटी घेऊन त्यांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचप्रमाणे मंदिरे आदी सार्वजनिक ठिकाणी ‘हलालमुक्त दिवाळी’ अभियानामध्ये सहभागी होण्याविषयी प्रबोधन करण्यात आले.

परळी

वर्‍हाड आणि टाटाचा माळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी होण्यासाठी बाजारपेठेतील व्यावसायिकांचे प्रबोधन करण्यात आले. हे अभियान रायगड जिल्ह्यातील जांभूळपाडा, परळी तसेच अन्य भागांत राबवण्यात आले.

या अभियानात वर्‍हाड आणि टाटाचा माळ येथील हिंदुजनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. नरेश खंडागळे, श्री. विशाल देशमुख, शाखाविस्तारक श्री. रोशन खंडागळे आणि श्री. अजय लखीमिले, श्री. निखिल वराडकर, अन्य धर्मप्रेमी सहभागी झाले होते.

बहिरीनाथ मंदिर परळी येथील मंदिरात ‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी करण्याची प्रतिज्ञा घेऊन पत्रकाद्वारे प्रबोधन करतांना समितीचे सदस्य

आम्ही घाऊक व्यापार्‍यांचेही प्रबोधन करून मागणी रहित करू ! – परळी येथील व्यापारी

परळीचे किराणा मालाचे व्यापारी श्री. मजेटीया यांनी स्वतःहून ‘हलाल प्रमाणित’ वस्तूंची सूची घेतली आणि म्हणाले ‘‘आम्ही घाऊक व्यापार्‍यांना सांगू की ‘हलाल प्रमाणित’ वस्तू कोणत्या आहेत  ? त्याचे प्रबोधन करू आणि मागणी रहित करू.’’

जांभूळपाडा
परळी
जांभूळपाडा
जांभूळपाडा