Conspiracy Of Separate Christian Country : भारत, बांगलादेश आणि म्यानमार यांचे विभाजन करून वेगळा ख्रिस्ती देश निर्माण करण्याचे षड्यंत्र !
मिझोरामच्या ख्रिस्ती मुख्यमंत्र्यांचा आणि अमेरिकी गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’चा डाव उघड !
वॉशिंग्टन (अमेरिका) : मिझोरामचे मुख्यमंत्री पीयू लालदुहोमा यांनी ४ सप्टेंबर २०२४ या दिवशी अमेरिकेतील इंडियानापूलिस येथे केलेल्या भाषणाची केवळ भारतातच नाही, तर बांगलादेश आणि म्यानमार येथेही चर्चा होत आहे. लालदुहोमा यांनी त्यांच्या भाषणात चिन-कुकी-जो यांचे ऐक्य आणि एक देश यांचे आवाहन केले होते. चिन-कुकी-जो या भारत, बांगलादेश आणि म्यानमार येथे रहाणार्या ख्रिस्ती जमाती आहेत. अमेरिकेतील या भाषणानंतर भारत, बांगलादेश आणि म्यानमार यांचे भाग वेगळे करून एक वेगळा ख्रिस्ती देश निर्माण करण्याचे काम अमेरिकी गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’ करत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
१. मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणामुळे दक्षिण आशियाला अस्थिर करणार्या फुटीरतावादी धोरणाविषयी चिंता निर्माण झाली आहे. लालदुहोमा यांच्या भाषणाला परकीय पाठिंबा असल्याची शंका निर्माण झाली आहे.
२. लालदुहोमा त्यांच्या भाषणात म्हणाले, तीन देशांतील तीन सरकारांमध्ये आपली (ख्रिस्त्यांची) अन्यायकारकपणे विभागणी झाली आहे. हे आम्ही स्वीकारू शकत नाही. लालदुहोमा यांनी राजकीय एकतेची ठाम दृष्टी प्रस्तावित केली, ज्यामुळे भारताच्या सार्वभौमत्वाविषयी चिंता निर्माण झाली.
SPEECH OF PU LALDUHOMA, CHIEF MINISTER, MIZORAM INDIANAPOLIS, USA, 4.09.2024
|
३. चिन-कुकी-जो समुदाय मणीपूर आणि मिझोराम या भारतीय राज्यांमध्ये, तसेच बांगलादेश अन् म्यानमार या देशांच्या काही भागांमध्ये पसरलेला आहे.
४. सामरिक हितसंबंध जोपासण्यासाठी फुटीरतावादी चळवळींना पाठिंबा दिल्याचा आरोप अमेरिकेवर यापूर्वीही करण्यात आला आहे. खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू हा ‘सीआयए’चा हस्तक मानला जातो.
Mizoram CM Lalduhoma’s Kuki-Zo Unity Speech in the US Sparks a Row – |
संपादकीय भूमिका
|