निरपेक्ष प्रेम करणार्‍या आणि समष्टी सेवेची तळमळ असणार्‍या पू. (सौ.) मनीषा पाठक !

पू. (सौ.) मनीषा पाठक

१. सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी मार्गावरील पटल विक्रेत्याला साधना सांगणे 

सौ. नम्रता शिरोडकर

‘६.४.२०२४ मध्ये पू. (सौ.) मनीषा पाठक आळंदी (पुणे) येथील धर्मप्रेमींना भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्या समवेत मीही गेले होते. धर्मप्रेमींना भेटून आम्ही पुण्यात परत येतांना रस्त्यावर काही पटल (टेबल) विक्रेते बसलेले दिसले. पू. मनीषाताईंनी एका विक्रेत्यांकडून एक पटल विकत घेतले. त्या वेळी पू. ताईंनी त्या विक्रेत्यांना त्यांची कुलदेवता विचारून त्यांना नामजप करण्याचे महत्त्व सांगितले. त्यांनीही ‘आम्ही नामजप करू’, असे सांगितले.

त्यानंतर पू. ताईंनी त्या विक्रेत्यांना प्रसादाच्या २ पुड्या दिल्या. त्या वेळी तेथे त्या विक्रेत्यांची पत्नी आणि त्यांचे लहान बाळही होते. तेव्हा पू. ताई त्या विक्रेत्याला म्हणाल्या, ‘‘हा प्रसाद तुमच्या बाळालाही द्या.’’

२. ‘समाजातील अनोळखी व्यक्तींना आपलेसे करणे आणि गुरूंनी सांगितलेली साधना सर्वांपर्यंत पोचवणे’, हे पू. मनीषाताईंकडून शिकायला मिळणे

या प्रसंगात ‘पू. मनीषाताई सनातनचे साधक, जिज्ञासू, धर्मप्रेमी आणि समाजातील अनोळखी जीव यांना प्रीतीने लगेच आपलेसे करतात’, असे माझ्या लक्षात आले. मला पू. ताईंमधील ‘व्यापकता, प्रीती, इतरांचा विचार करणे आणि समष्टी सेवेची तळमळ’, या गुणांचे दर्शन झाले. ‘जिथे साधना सांगण्याची संधी मिळेल, तिथे साधना सांगायची आणि गुरूंनी सांगितलेली साधना सर्वांपर्यंत पोचवायची’, हे मला पू. ताईंकडून शिकायला मिळाले. त्याबद्दल गुरुदेव आणि पू. मनीषाताई यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. नम्रता शिरोडकर (वय ५२ वर्षे), पुणे (२६.६.२०२४)

जगात कोणताही सिद्धांत नसतो. एकही सिद्धांत अस्तित्वात नाही. परिवर्तनशीलता हाच जगाचा नियम आहे. सिद्धत्वाप्रत जाण्याची प्रक्रिया सिद्धत्वाला अनुसरूनच होते. सिद्धत्वानंतर आत्मस्थितीची प्रचीती येते आणि प्रवासाचा अंत होतो.

– प्रा. गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे, कोल्हापूर (‘गुरुबोध’)