Canada Temple Attack Issue : कॅनडाच्या राजकीय नेत्यांना मंदिरात प्रवेशबंदी ! – ‘कॅनेडियन नॅशनल कौन्सिल ऑफ हिंदूज’

‘कॅनेडियन नॅशनल कौन्सिल ऑफ हिंदूज’चा निर्णय

ओटावा (कॅनडा) – हिंदु मंदिरावर खलिस्तान्यांनी केलेल्या आक्रमणानंतर ‘कॅनेडियन नॅशनल कौन्सिल ऑफ हिंदूज’ने कॅनडातील सर्व नेत्यांना हिंदूंच्या मंदिरांमध्ये जाण्यास बंदी घालण्याची घोषणा केली आहे. ‘जोपर्यंत खलिस्तान्यांवर कारवाई होत नाही आणि मंदिरांची सुरक्षा बळकट केली जात नाही, तोपर्यंत मंदिरांचा राजकीय हेतूने वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

राजकारणी कोणत्याही पक्षाशी संबंधित असले, तरीही ते भक्त म्हणून येऊ शकतात; मात्र जोपर्यंत ते खलिस्तानी आतंकवाद्यांचे सूत्र  सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न करत नाहीत, तोपर्यंत त्यांना मंदिरांच्या व्यासपिठावर प्रवेश मिळणार नाही’, असे या संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

(चित्रावर क्लिक करा)

संपादकीय भूमिका

भारतात हिंदूंच्या मंदिरांवर आणि धार्मिक मिरवणुकांवर होणार्‍या आक्रमणांनंतर आता येथील हिंदूंनीही असाच निर्णय घेतला, तर आश्‍चर्य वाटू नये !