अकोला येथील थोर संत प.पू. दत्त महाराज कुळकर्णी यांचा देहत्याग !
अकोला – येथील थोर संत प.पू. दत्त महाराज कुळकर्णी यांनी ३ नोव्हेंबरच्या सायंकाळी ७.५५ वाजता वयाच्या ९४ व्या वर्षी देह ठेवला. प.पू. दत्त महाराज कुळकर्णी यांनी गेली अनेक वर्षे दत्तभक्तीचा प्रचार केला. महाराष्ट्रातील विदर्भ आणि अन्य परिसरात त्यांचा मोठा भक्तपरिवार आहे.
Renowned saint from Akola, His Holiness Datta Maharaj Kulkarni renounces his body
He had a vast follower base in Vidarbha, Maharashtra, and beyond.
Devotees sought his guidance for various personal issues, and many experienced solace through his blessings, sacred offerings, and… pic.twitter.com/Hk24uVVzjt
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 4, 2024
अनेक भक्त आपल्या वैयक्तिक अडचणी घेऊन महाराजांकडे येत असत. महाराजांनी दिलेले तीर्थ, विभूती, ताईत इत्यादी घेऊन अनेकांना चांगल्या अनुभूती येत असत. केवळ व्यक्तीचे छायाचित्र पाहूनसुद्धा महाराज आध्यात्मिक उपचार सांगत असत, इतका त्यांचा अधिकार होता. सनातन संस्थेच्या कार्याला त्यांचे नेहमीच आशीर्वाद लाभले. अशा थोर विभूतींच्या चरणी कोटीश: प्रणाम !