Saffron Flag On Masjid Issue : भागलपूर (बिहार) येथे मशिदीवर भगवा झेंडा फडकवल्याच्या कथित घटनेमुळे तणाव

एका हिंदु तरुणाने चप्पल काढून मशिदीच्या शेजारील दुकानावर चढून तार वर करण्याचा प्रयत्न केला

भागलपूर (बिहार) – येथे श्री  कालीमातेच्या मूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या वेळी मशिदीवर कथितरित्या भगवा झेंडा फडकवल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाल्यानंतर येथे तणाव निर्माण झाला. या वेळी किरकोळ हाणामारी झाली; मात्र प्रशासनाने तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या काळात २ घंटे मूर्तीचे विसर्जन थांबवण्यात आले होते. प्रशासनाने झेंडा फडकवणार्‍या तरुणाला कह्यात घेतले असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

या संदर्भात या घटनेचे प्रत्यक्षदर्शी जगदीश प्रसाद यांनी सांगितले की, असे काहीही चुकीच्या उद्देशाने केले गेले नाही. विसर्जनाच्या वेळी मशिदीजवळ एक तार अगदी खाली लोंबकळत होती. त्यामुळे मूर्ती असणारे वाहन पुढे जाऊ शकत नव्हते. मशिदीजवळ  मुसलमान समाजातील काही लोकही बसले होते. त्यांना विचारणा करून एका हिंदु तरुणाने चप्पल काढून मशिदीच्या शेजारील दुकानावर चढून तार वर करण्याचा प्रयत्न केला. तरुणाने तार वर करण्यासाठी काठी मागितली असता खालून कुणीतरी चुकून त्याला भगवा झेंडा जोडलेली काठी दिली. तरुणाने तोच झेंडा घेऊन तार उंचावली आणि नंतर मूर्ती असणार्‍या वाहनाला पुढे जाता आले. या अपसमजामुळे हे प्रकरण वाढले आणि दोन समाजांत तणाव निर्माण झाला.

संपादकीय भूमिका

मशिदीवर कथित भगवा झेंडा फडकवल्यावरून तणाव निर्माण केला जातो; मात्र हिंदूंच्या मिरवणुका आणि मंदिरे यांवर आक्रमणे केली जातात, तेव्हा तणाव झाला, तर हिंदूंनाच उत्तरदायी ठरवले जाते !