Woman Forced To Clean Hospital Bed : पतीचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयाने गरोदर पत्नीला स्वच्छ करायला लावले पलंगावरील रक्ताचे डाग !
|
दिंडोरी (मध्यप्रदेश) – येथील गदासराईतील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती असणार्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या गरोदर पत्नीला पतीला ठेवण्यात आलेला पलंग (बेड) रुग्णालयाने स्वच्छ करायला लावला. यास या महिलेने नकार देऊनही तिला बलपूर्वक पलंग स्वच्छ करण्यास भाग पाडले. या पलंगावर रक्ताचे डाग पडले होते. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने छोटीबाई ठाकूर (आया) आणि राजकुमारी मर्कर या २ कर्मचार्यांना निलंबित केले.