Muzaffarnagar Govardhan Puja Violence : धर्मांध मुसलमानांनी हिंदूंना घरात घुसून मारहाण केली आणि ‘गोवर्धन पूजे’वर थुंकले !

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील घटना

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथे गोवर्धन पूजेच्या वेळी धर्मांध मुसलमानांनी हिंदूंच्या घरात घुसून त्यांना मारहाण केल्याची, तसेच मुलींचा विनयभंग केल्याची घटना घडली. या वेळी धर्मांध मुसलमान गोवर्धन पूजेवर थुंकले. ही घटना उघडकीस येताच भाजप शहराचे आमदार आणि राज्य सरकारचे मंत्री कपिलदेव अग्रवाल यांनी तातडीने घटनास्थळ गाठून आरोपींना अटक करण्याचे आदेश पोलीस अधिकार्‍यांना दिले. माहिती मिळताच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारीही तत्काळ पोलीस बंदोबस्तात घटनास्थळी पोचले. त्यांनी आरोपींपैकी एका मुसलमान तरुणाला अटक केली. मारहाणीत घायाळ झालेल्या पीडित कुटुंबाला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले.

धर्मांध मुसलमान प्रत्येक सणाला त्रास देतात ! – पीडित कुटुंबियांचा आरोप

पीडित कुटुंबातील एका मुलाने सांगितले की, एक मुलगा माझ्या बहिणीवर थुंकला. मी त्याला विरोध केल्याने त्याने मला मारहाण केली. आमच्याशी गैरवर्तन केले आणि मारहाण केली. माझे वडील उपस्थित नव्हते. माझी आई आणि दोन्ही बहिणी यांना दुखापत झाली. आमच्यावर घर विकण्यासाठी दबाव आणला जात आहे. हे लोक गोवर्धन पूजेवरही थुंकले. त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी आमची इच्छा आहे. हे लोक प्रत्येक सणाला त्रास देतात.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेशात भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार असतांनाही धर्मांध मुसलमानांचे हिंदूंवर अशा पद्धतीने आक्रमण करण्याचे धाडस होते, याचा अर्थ ते किती उद्दाम झाले आहेत आणि त्यांना आता कठोरातील कठोर शिक्षा करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे !