लॉरेन्स बिष्णोईच्या भावाचे अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्याविषयी प्रक्रिया चालू

लॉरेन्स बिष्णोईचा व त्याचा भाऊ अनमोल बिष्णोई

मुंबई – सलमान खानला जिवे मारण्याची धमकी देणार्‍या टोळीचा प्रमुख लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई अमेरिकेत लपून बसल्याची माहिती समोर आली आहे. लॉरेन्सचा बिष्णोईचा धाकटा भाऊ अनमोल बिष्णोई त्यांच्या देशात असल्याची माहिती अमेरिकी अधिकार्‍यांनी मुंबई पोलिसांना दिली आहे.

मुंबई पोलिसांनी त्याच्या प्रत्यार्पणासाठी विचारणा करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. गेल्या महिन्यात गुन्हे शाखेने त्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला एका वरिष्ठ अधिकार्‍याने ही माहिती दिली.