विश्रामबाग पोलिसांनी घेतले चोरट्याला कह्यात !
पुणे – शहरात लूटमार करणार्या चोरट्याल्या विश्रामबाग पोलिसांनी कह्यात घेतले. त्याच्याकडून २ पिस्तुले, ४ काडतुसे जप्त केली. शास्त्री रस्ता परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली. रफिक खान असे कह्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव आहे. चोरट्याविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न करणे, लूटमार, हाणामारी करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. (चोरट्यांना पोलिसांचे भय राहिले नसल्यामुळे लूट, हाणामारी, हत्या, हत्येचा प्रयत्न करणे अशा गोष्टी सर्रास घडत आहेत. पोलिसांनी वचक निर्माण होईल अशी कारवाई करायला हवी. – संपादक)