इतरांविषयी कणव आणि गुरूंप्रती भाव असणारी ठाणे येथील कु. यशिता सुशील खोडवेकर (वय १० वर्षे) हिची गुणवैशिष्ट्ये !
ठाणे येथील कु. यशिता सुशील खोडवेकर हिचा ४.११.२०२४ (कार्तिक शुक्ल तृतीया) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आजी आणि आई यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. यशिता सुशील खोडवेकर हिला १० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !
सौ. सुप्रिया गायकवाड (यशिताची आजी), ठाणे
१. नामजप करणे : ‘मी कु. यशिताला नामजपाचे महत्त्व सांगताच तिने नियमित ‘दत्त आणि कुलदेवी’ यांचा नामजप लिहायला आरंभ केला. मागील एक वर्षापासून ती माझ्या समवेत ठाणे येथील सेवाकेंद्रात येऊन १ घंटा नामजप लिहिते. ती आवडीने माझ्या समवेत सेवाकेंद्रात येते.
२. नामजप केल्यामुळे भीती जाऊन श्रद्धा वाढणे : पूर्वी यशिता फारशी कुणाबरोबर बोलायची नाही. ती केवळ घरातील कुटुंबियांशी बोलत असे. तिचा नामजप वाढू लागल्यावर तिच्यात पालट झाले. ती आता तिच्या मैत्रिणींशी बोलते आणि खेळते. तिचा भित्रेपणा जाऊन तिची श्रद्धा वाढली आहे.
३. वाणीत चैतन्य आणि गोडवा असणे : ती ३ – ४ वर्षांची असल्यापासून तिचे सर्व श्लोक आणि स्तोत्रे तोंडपाठ आहेत. तिच्या वाणीत गोडवा आणि चैतन्य आहे. तिचे श्लोक म्हणणे आणि स्तोत्रपठण ऐकावेसे वाटते.
४. तिचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीकृष्ण यांच्याप्रति पुष्कळ भाव आहे.’
सौ. मृण्मयी खोडवेकर (आई), ठाणे
१. इतरांविषयी कणव : ‘घरातील कुटुंबीय किंवा शाळेतील मैत्रिणी यांना दुःख होत असेल, तेव्हा यशिताही दुःखी होते. यशिता त्यांच्याजवळ जाऊन त्यांची विचारपूस करते. त्यांना बरे वाटावे, म्हणून प्रयत्न करते. ‘सगळे आनंदी असावेत’, असा तिच्या मनामध्ये भाव असतो.
२. स्वभावदोष : मनासारखे झाले पाहिजे, चिडचिडेपणा, हट्टीपणा, भ्रमणभाष पहाणे.’
(सर्व सूत्रांचा दिनांक – २८.४.२०२४)